Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल !

0 41

अनेक गाड्यांना डबे वाढवले ; ‘भावनगर-कोचुवेली’ला उद्यापासून अतिरिक्त कोच

रत्नागिरी ः सुट्टीचा हंगाम संपत आल्याने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या विविध गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यातील भावनगर ते केरळमधील कोचुवेलीपर्यंत धावणारी गाडी दि. 7 जूनपासून जादा जोडण्यात आलेल्या डब्यासह धावणार आहे. सध्या या मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत.
या संदर्भात रेल्वेकडून माहितीनुसार उधना (सुरत)-मंगळुरु (09057/09058) या सप्ताहिक समर स्पेशल गाडीला उधना येथून दि.5 जूनपासून तर मंगळुरुहून सुटताना दि. 6 जूनपासून स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढण्यात आला आहे. याचबरोबर गांधीधाम-तिरुनेलवेली (20924/20923) गांधीधामहून दि. 6 जूनपासून तर तिरुनेलवेली येथून सुटणार्‍या फेरीसाठी दि. 8 जूनच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा तात्पुरत्या स्वरुपात वाढण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या भावनगर-कोचुवेली (19260/19259) या गाडीला भावनगरहून दि. 7 जूनपासून तर कोचुवेलीहून दि. 9 जूनपासून स्लीपरचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्‍यांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.