22 मेपसून कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन
रत्नागिरी : शहरातल गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभाग आणि ध्येय अॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील टी.एस.पी.एल. ग्रुपच्या सहकार्याने महाविद्यालयातून 2020-21 या शैक्षणिक वर्षात पदवी घेतलेले 2021-22 या वर्षामध्ये पदवी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 22 मे 2022 रोजी सकाळी 10.00 पासून मुलाखतीची प्रक्रिया सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत उपस्थित राहावे. रांजणगाव, पुणे येथील इकोरिया कुरोडा इलेक्ट्रिक इं. प्रा. लि.; इरोन इंडस्ट्रीयल सिस्टम्स प्रा. लि.; हायर अॅप्लायन्सेस प्रा. लि. इ. कंपन्यांमधील विविध पदांकरिता होणार्या कॅम्पस इंटरव्ह्यूकरिता आर्ट्स, सायन्स व कॉमर्स विद्याशाखांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात.
या संदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट द्यावी तसेच प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
