उरण (विठ्ठल ममताबादे ): ग्राम बीजोत्पादन मोहिमे अंतर्गत जया भात बियाणे वाटप नोंदणीकृत शेतकऱ्यांना दि. 30/05 /2022 रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायत चिरनेर येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, सरपंच संतोष चिरलेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ ढवळ, कृप शिवाजी लोहकरे,कृस निखिल देशमुख, कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटिल व मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
