Ultimate magazine theme for WordPress.

चाईल्ड केअरतर्फे आरोग्य चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

0 33

.उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड संस्थापक, अध्यक्ष – विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मैदान येथे 40+ आरोग्य चषकचे आयोजन करण्यात आले होते. चाईल्ड केअर संस्थेने अनेक उप क्रम राबबले त्यात आणखीन एका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते म्हणजे 40+ आरोग्य चषक 2022.

चाईल्ड केअर सामाजिक संस्थे तर्फे आयोजित 40+ आरोग्य चषक ठेवण्यात आले. त्यामध्ये अंतिम फेरीत जितू स्पोर्ट 40+करळ आणी फ्रेंड्स 40+सोनारी या संघानी मजल मारली.तर फ्रेंड्स 40+संघ सोनारी या संघानी 40+आरोग्य चषक 2022 प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक जितू स्पोर्ट 40+करळ संघानी पटकावला.  उत्कृष्ट फलंदाज जयवंत तांडेल (करळ),उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद कडू (सोनारी ),उत्कुष्ट श्रेत्ररक्षक हिराचंद्र तांडेल (करळ), मालिकावीर जितू कडू (सोनारी )यांना सम्मानित करण्यात आले .या स्पर्धेचे उदघाटन  मनोज भगत अध्यक्ष -उरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल पाटील उपाध्यक्ष -वाहतूक सेना, विवेक पाटील -अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठान, अविनाश शेठ माजी उपसरपंच पागोटे, किशोर कडू सोनारी, दिनेश ठाकूर करळ, जगदीश म्हात्रे भेंडखळ, संदीप तांडेल  पागोटे हे उपस्थित होते. तर चाईल्ड केअर संस्थेचे संस्थापक- विकास कडू, उपाध्यक्ष -तुषार ठाकूर, उपाध्यक्ष -राजेश ठाकूर, मनोज ठाकूर सदस्य -रोशन धुमाळ, विपुल कडू, विवेक कडू आणी आजू बाजू च्या परिसरातील क्रिकेट रसिकमोठया संख्येने   उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मनोज भगत मनोगत प्रसंगी म्हणाले कि चाईल्ड केअर संस्थे ने या स्पर्धा भरवून 40+उरण ला एक नव संजीवनी दिली. या बद्दल संस्थेचे संस्थापक विकास कडूचे आणी सर्व टीम चे अभिनंदन करतो आणी पुढे दर वर्षी अशा स्पर्धा भरवाव्यात अशी विनंती मनोज भगत यांनी आपल्या मनोगतातून केली.कुणाल पाटील यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले कि या स्पर्धे मध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावले हे माझे भाग्य समजतो.तर उरण मधील  सुप्रसिद्ध निवेदक विवेक पाटील  आपले मनोगत मांडताना म्हणाले कि चाईल्ड केअर संस्थेने जो आरोग्य चषक आयोजित केले आहे ते संपूर्ण उरण तालुक्यासाठी खूप मह्त्वाचे आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्याकडे लक्ष द्या हे ब्रीद वाक्य सांगणारे  विकास कडू यांचे खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे.तर स्पर्धेचे आयोजक विकास कडू  यांनी आपले मनोगत मांडताना ही स्पर्धा फक्त निमित्य आहे 40+ नंतर लोक घरी बसतात.जास्त शरीराची हालचाल करत नाहीत परंतु उरण उलवे नोड  40+ असोसिएशन जे काय संपूर्ण उरण उलवे नोडपरिसरात जी काय स्पर्धा भरवतात त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण उरण तालुक्यातील खेळाडू सहभाग घेऊन एक धाव आरोग्य साठी हे ब्रीद वाक्य बनवले आहे.त्यासाठी मी सर्व स्पर्धेकांचे, उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो. या शब्दात उपस्थितांचे विकास कडू यांनी आभार मानले.स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तर स्पर्धेचे समालोचन मनोज तांडेल (सोनारी )आणि आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष तुषार ठाकूर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.