उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून कोट्यावधी रूपये किमतीच्या सात कंटेनरची खळबळजनक चोरीचा प्रकार घडला आहे.हा प्रकार गोदामात काम करणाऱ्या मार्केटींग मॅनेजर अलिम शेख याने केलाअसल्याचा आरोप गोदामाचे मालक अरविंद मांगिलाल गेहलोत याने केला आहे. यागोदामातून कस्टम बॉण्डेड 1 कोटी 38 लाख 74 हजार 240 रूपये किंमतीचा मालचोरी झाला आहे.
जेएनपीटीच्या अनुषंगाने आयात निर्यात माल साठविण्यासाठी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदामे तयार झाली आहेत. या गोदामांना कस्टम विभागाने परवानगी देताना कोणतीही काळजी घेतली नसल्यानेही गोदामें म्हणजे चोरांचे अड्डेच झाले आहेत. शिवाय या गोदामामध्ये कोणता माल, शस्त्रास्रे, स्फोटके आहेत या बाबत कोणत्याही सुरक्षा यंत्रणांना माहिती नसते. त्यामुळे अशी गोदामे हे अनैतिक उद्योगांचे अड्डे ठरले जातात. चिरनेर परिसरात देखिल अशा प्रकारचे अनधिकृत गोदामे तयार झाली आहेत.त्याचाच हा परिपाक असल्याचे बोलले जाते. चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून मागील जून महिन्यात ही चोरीची घटना घडली आहे. या मामाश्री गोदामातून शेरलीन कंपनीच्या कॅनव्हास शूज, मॅजिक क्यूब, बेबी करेज, फुट स्क्रबर, प्लास्टीक सोप बॉक्स, कॉस्मेटीक, ग्लड क्रीम आदी प्रकारचा सुमार 1 कोटी 38 लाख 74 हजार रूपये किंमतीचा मालाचा अपहार करण्यात आला आहे.
अलिम शेख यांने मामाश्री गोदामातील पावत्या व इतर कागदपत्रे चोरीने घेवून हे सात कंटेनर बाहेर काढण्यासाठी लागणारी कस्टमची परवानगी मिळवीली होती. त्यानंतर त्याने हे कंटेनर गोदामाच्या बाहेर काढले होते.आणि या बाबतची कुणकुण कंपनीच्या मालकांना आणि कस्टम विभागाला लागल्यानंतर त्याने हे कंटेनर मालासहीत परत आणण्याचे कबूल केले होते आणि त्या मालातील 350 कार्टून परत आणून दिले होते. मात्र माल ठेवलेल्या पार्ट्यांना त्यांचा माल मिळाला नाही म्हणून त्यांनी याबाबत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा त्याच्या तपासात मालाचा अपहार झाला असल्याचे उघड झाले. त्यानंतर कपंनीचे मालक अरविंद गेहलोत यांनी या बाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरु आहे.