Ultimate magazine theme for WordPress.

जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या ३ ऑक्टोबरपर्यंत वाढवल्या

0 29

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जबलपूर -कोईमतुर सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशलच्या फेऱ्या 3 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 021 98 ही गाडी दिनांक 5 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी मध्य प्रदेशातील जबलपुर जंक्शन वरून सुटेल आणि दक्षिणेतील कोईमतूर स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीच्या विस्तारित करण्यात आलेल्या फेऱ्यानुसार ही गाडी 02197 सप्टेंबर दिनांक 8 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तामिळनाडूमधील कोईमतूर जंक्शन वरून दर सोमवारी दुपारी तीन वाजून 25 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी ती सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी जबलपूरला पोहोचेल.

जबलपूर कोईमतूर सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या संपूर्ण प्रवासात नरसिंगपूर, गडरवारा, पिपारिया, इटारसी, हरडा, खांडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, मूकांबिका रोड, बिंदुर, कुन्दापुरा, उडुपी, मुलकी, मंगळूर जंक्शन, कासरगोड कन्नूर, कोझीकोड, शोरनूर तसेच पलघत पालकांवर थांबे घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.