जम्प रोप स्पर्धा महाराष्ट्र राज्य चषक स्पर्धेत आर्या भोपीने पटकाविले सुवर्ण पदक
उरण दि. 29 (विठ्ठल ममताबादे ) : दुसरे जम्प रोप सब जूनिअर, जूनिअर सिनिअर स्टेट चॅम्पियनशीप 2022 ही स्पर्धा 27 ऑगस्ट 2022 से 28 ऑगस्ट 2022 दरम्यान माळी समाज मंगल कार्यालय तालुका तळोदे,जिल्हा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील रिटघर गावची कन्या कु. आर्या भारत भोपी हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत या स्पर्धेत सुवर्णं पदक मिळविले आहे. भारतीय जम्प रोप महासंघ,जम्प रोप असोशिएशन महाराष्ट्र,नंदुरबार जिल्हा जम्प रोप अमैनेच्यूअर असोशिएशन,बिरसा मुंडा स्पोर्टस अकॅडमी, सोरापाडा आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग, कला वाणिज आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात कुमारी आर्या भारत भोपी (रिटघर- पनवेल ) हिने सुवर्ण पदक पटकाविल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.सुवर्ण पदक पटकविल्याने आर्या भोपी हिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आर्या भोपीला मार्गदर्शन करणारे शिक्षक निलेश भोसले, अनुज भोसले, रोहित सर, अनामिका मॅडम, सेंट अंड्राईस इंटरनॅशनल स्कुल वाकडी या सर्वांचेही कौतुक होत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कु. आर्या भोपी हिच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचे मान उंचावल्याने कु. आर्या भोपी हिचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.