जिल्हास्तरीय पिंचॅक सिलाट स्पर्धेत दापोलीचा चमू उपविजेता
अन्वी गिम्हवणेकर,मंथन शिंदे सह ३५ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी
अन्वी गिम्हवणेकर,मंथन शिंदे सह ३५ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी दापोली : दोन दिवसांपूर्वी रोजी समर्थ कृपा इंग्लिश मेडीअम स्कूल वेरळ-खेड येथे तिसऱ्या पिंचॅक सिलाट जिल्हास्तरीय स्पर्धेत दापोलीची टीम उपविजेता ठरली आहे.तब्बल ३५ जणांनी या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे तर १८ रौप्य व तीन कांस्य पदक मिळवून दापोली टीमने बाजी मारली आहे.पिंचॅक सिलाट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट मधील खेळाचा प्रकार असल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिली.
या स्पर्धेत एकूण 189 मुलांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये दापोलीच्या विद्यार्थानी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून करून उपविजेतापदावर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले समर्थकृपा इंग्लिश मिडीअम स्कुल खेड वेरळचे संस्थापक श्री.पाष्टे सर, पिंचक सिलाट स्पोर्टस असो. ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष हर्षदिप सासणे उपाध्यक्ष-र्वैजेश सागवेकर टेक्निकल डायरेक्टर- सायली शिंदे-घोलप, पत्रकार श्री साळवी व सुरेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ही स्पर्धा वेगवेगळ्या वयोगट व वजनी गटात घेण्यात आली. सुवर्णपदक विजेते- अन्वी गिम्हवणेकर , वैष्ठाव शिंदे, मंथन शिंदे, नाविन्या सोनवाडकर,सौम्या आंजर्लेकर, अपूर्वा लिंगायत, सार्थक माळी, उत्कर्षा पाटील, अथर्व गोरीवले, ऋषीकेश गुहागरंकर सलोनी पवार, स्नेहा भाटकर, आयुषी काटकर, रोहन मोहिते, सावनी रांगले, सुरज तरडे, , मितुशा साळुंखे, गार्गी केळकर,स्वरा लिंगावळे, अनन्या चव्हाण, प्रांगण चव्हाण,शर्वरी गोफणे, साईप्रसाद वराडकर अंथर्व पवार शर्वरी गोफणे, अर्णव गोफणे शर्वरी पांदे ओम भागवत, प्रथमेश जानराव, रुपाली अलकुंटे, सेजल माने, सोनल खळे शुभम मते, संकेत मळेकर, आशिष बेर्डे,
रौप्य पदक विजेते- राखी शोरे संदेश चव्हाण ओम विचारे, करण वाडकर, चिन्मय गुरव,आर्यन पवार,आर्या चव्हाण,गायत्री करांडे, सम्राट महाडीक, सुहान बैकर, आरुष गोलांबडे, आदी भांबीड, देवयानी देवघरकर, रोहन माने, श्रद्धा लोखंडे, स्वराली रुके आराध्य लिंगावळे, भक्ती माळी. कांस्य पदक विजेते- अर्णव येलवे, ज्ञानदा सकपाळ अनिकेत पवार या सगळया विद्यार्थाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थाना प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थाच्या स्वागतासाठी दापोली बसस्थानकामध्ये मोठ्या संख्येने पालकवर्ग व लाठी स्पोर्टस असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ऊत्तम पाटील आवर्जुन उपस्थित होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून पुढील वाटचालीस कौतुक शुभेच्छा दिल्या.