Ultimate magazine theme for WordPress.

तेजस एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत धावणार !

0 38


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस दि. १ नोव्हेंबर २०२२ पासून करमाळी ऐवजी मडगावपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
मुंबईतील सीएसएमटी ते करमाळी (22119/22120) धावणारी तेजस एक्स्प्रेस गोव्यातील करमाळी ऐवजी मडगावपर्यंत नेण्याची मागणी या आधीपासून करण्यात येत होते. अखेर या मागणीला यश आले असून आता ही गाडी दि. 1 नोव्हेबरपासून मडगावपर्यंत विस्तारित केली जाणार आहे.

ही गाडी सीएसएमटी स्थानकातून पहाटे 5.50 वाजता सुटून दुपारी 2 वा. 40 मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (22120) मडगावहून दुपारी 3 वा. 15 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ती 11.55 वा. ती मुंबईत सीएसएमटी टर्मिनसला पोहचेल
कोकण रेल्वेच्या गाड्या 31 ऑक्टोबरपर्यत पावसाळी वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. हे वेळापत्रक संपून नियमित वेळापत्रकाच्या पहिल्या दिवसापासून दि. 1 नोव्हेंबरपासून हा बदल केला जाणार आहे. तोपर्यंत तेजस एक्स्प्रेस करमाळीपर्यंतच धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.