Ultimate magazine theme for WordPress.

दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस २७ पासून २४ डब्यांची धावणार!

0 52

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच डबे वाढवले गणेश भक्तांना दिलासा

रत्नागिरी २५ : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला पाच डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तुतारी एक्सप्रेस 27 ऑगस्टपासून 24 डब्यांची धावणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची कन्फर्म तिकीटे मिळणे अवघड झाल्याने कोकण रेल्वे तुतारी एक्सप्रेसला एक एसी थ्री टायर, दोन स्लीपर तर दोन सेकंड सीटिंग असे एकूण पाच डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्सप्रेस आता 19 वरून 24 डब्यांची धावणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट 12 सप्टेंबर या कालावधीत हा बदल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे या निर्णयामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.