Ultimate magazine theme for WordPress.

नागपूर-मडगाव कायमस्वरूपी सुपरफास्ट रेल्वे गाडी सुरु करा

0 46

कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समितीची मागणी

चिपळूण : नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव  सुपरफास्ट स्पेशल कायमस्वरूपी सुरू करण्याची व पेण, पाचोरा जं.चाळीसगाव जं. शेगांव, मुर्तीजापुर थांबा देऊन रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबईने केली आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, इंदापूर, कोलाड,नागोठणे,पेण रत्नागिरी  जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड,दापोली  सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी,वेंगुर्ले, मालवण, देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत. दापोली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे,जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत  व विदर्भातील प्रसिद्ध संत  गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ. बाबासाहेब  आंबेडकर यांची दिक्षाभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी  हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर ,कारंजा येथील दत्त गुरूचे  स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा स्मृतीस्थान, धुळे येथील देवापुर येथील स्वामीनारायण मंदिर,जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात.

नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ,जळगाव केळीची मोठी बाजारपेठ व केळीची मोठी उत्पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा, मालवणी खाजा,कडक बुंदीचे लाडू,चुरमुऱ्याचे लाड, सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी, पेणचे पापड,कुरडई, लोणचे,पांढरा कांदा, पश्चिम बंगाल मधिल हल्दीराम रसगुल्ला, रसमलाई, गुलाबजाम,पेठे, मिठाई,संत्रा वडी , नारळवडी,आंबा व फणसवडी या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे तसेच धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र,पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र,यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे.तसेच कोकण ते खान्देश,विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम,सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड,रत्नागिरी,चिपळूण, खेड, माणगाव,पेण या थांब्यावरून नागपूरकरिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत. या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे की, हि ०१२५५/०१२५६ मडगाव ते नागपूर किंवा अमरावती मडगाव  रेल्वेसेवेला पेण चाळीसगाव, पाचोरा, जळगांव, मुक्ताईनगर,नांदुरा,जळंब जं,शेगांव,मुर्तीजापुर अधिकृत थांबे मिळावे समर स्पेशल ०१२५५/०१२५६ नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव  सुपरफास्ट स्पेशल  सुरू करण्याची कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजकुमार व्यास, प्रवासी संघटना अध्यक्ष शेखर नागपाल, जनसंपर्क तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले, पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,प्रवासी सुधीर राठोड,दिपक सोनवणे,ओमकार उमाजी माळगांवकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे,शिवसेना बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.