पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज देहूमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील. प्रथम पुण्यातल्या देहू येथील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित असतील. त्यानंतर मुंबईतल्या तीन कार्यक्रमांना त्यांची हजेरी असेल. देहूतल्या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साध