Ultimate magazine theme for WordPress.

पनवेल तालुक्यामधील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश

0 31

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे ) :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुक्याच्या वतीने केळवणे विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित तसेच मनसे पक्षातील सर्व नेते व आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन होऊन यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला.पक्षातील सर्व नेते, आमचे जवळचे मार्गदर्शक आ.राजू दादा पाटील या सर्वांचे सहकार्य मला लाभला आहे.पनवेल मध्ये पक्षाला नवीन भरारी मिळत आहे.कार्यकर्त्यांचा ओघ पक्षाकडे सुरु आहे. त्यांच्या सक्षम कार्यावरही मी पनवेल तालुका म्हणून बारकाईने लक्ष देऊन काम करत आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाण्याची ताकद आमच्या मनसैनिकांमध्ये आहे.असे मत रामदास पाटील यांनी व्यक्त केले. राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले पत्रक नवीन येणाऱ्या मनसैनिकांना देण्यात आले. यावेळी नरेंद्र मोकल उपतालुका अध्यक्ष पनवेल,गिरीश तिवारी रायगड जिल्हा सहकार क्षेत्र उपस्थित होते.पुढील निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करून काम करण्याचे पक्षातील सर्व नेत्यांचे पाठबळ व आशीर्वाद घेऊन काम करत आहोत असेही रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.