Ultimate magazine theme for WordPress.

पागोटे येथील एपीएम टर्मिनल्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न

0 43

पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात.

दोन दिवसात जेएनपीटी प्रशासन,ओल्ड मर्क्स कंपनी प्रशासन, कामगार,यांच्यात संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा कामगारांचा कंपनी प्रशासनाला इशारा

उरण दि. 7 (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील पागोटे येथील एपीएम टर्मिनल्स (ओल्ड मर्क्स कंपनी) ने कामगारांवर अन्याय केला असून या कंपनीत बदली काम घेतले जात नाही तसेच मृत व्यक्तींच्या वारसांनाही कामावर घेतले जात नसल्याने येथील कामगारांवर अन्याय सुरूच आहे. अनेकवेळा कामगांरानी लोकशाही, कायदेशीर मार्गाने मागण्या, पत्रव्यवहार करून देखील कंपनी प्रशासन कामगारांच्या मागण्याकडे जाणून बूजून दुर्लक्ष केल्याने शेवटी कामगारांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अडव्होकेट भार्गव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 7/6/2022 पासून ओड मर्क्स कंपनीच्या गेटसमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दिनांक 7 जुलै 2022 रोजी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे.भर उन्हातानात दिवसभर बसूनही न्याय मिळत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.कामगारांमध्ये यामुळे कंपनी व्यवस्थापना विरोधात तीव्र संताप पसरला होता.शेवटी कामगारांनी दिनांक 7/7/2022 रोजी ठीक सकाळी 10 आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.याचे गांभीर्य ओळखून अगोदरच पोलीस प्रशासनाने कंपनी गेट समोर व आंदोलन स्थळी सुरक्षा वाढवली. फायर ब्रिगेडचे वाहन व जवान सुद्धा घटना स्थळी हजर होते. शेवटी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था कोणीही बिघडवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन कर्त्यांनी सकारात्मक व शांततेची भूमिका घेतली.ओल्ड मर्क्स कंपनीचे एच आर योगेश ठाकूर यांनी पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समक्ष एक पत्रक कामगारांचे नेते अडव्होकेट भार्गव पाटील यांना दिले व येत्या दोन दिवसात बैठक लावण्याचे कबूल केले. कंपनीचे एच आर योगेश ठाकूर यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे भार्गव पाटील यांनी सांगितले. मात्र मिटिंग मध्ये योग्य निर्णय झाला नाही तर पुढे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचेही भार्गव पाटील यांनी सांगितले.

दिनांक 7/6/2022 रोजी कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू झाल्याने ओल्ड मर्क्स कंपनी पागोटे चे एच आर हेड योगेश ठाकूर यांनी पोलिस प्रशासना सोबत झालेल्या चर्चेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र योगेश ठाकूर यांनी त्यानंतर कोणतेही प्रतिसाद दिले नाही.जवळ जवळ 19 मिटिंग या बाबतीत झाल्या. मात्र कोणतेही ठोस निर्णय कंपनी प्रशासनाने घेतले नव्हते. त्यामुळे कामगारांच्या अजूनही कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहित. उलट दिवसेंदिवस ही समस्या तीव्र बनत चालली आहे.धरणे आंदोलन सुरु असल्याने कामगारांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. स्थानिक भूमीपुत्रांनी अर्थातच कामगारांनी आपल्या जमिनी या कंपनीसाठी दिल्या.या जमिनी देणाऱ्या कामगारांवरच कपंनीने अन्याय केला आहे.आता या कामगारांना उपजिविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने या कामगारांवर या खूप मोठा अन्याय होत आहे. या सर्व घटनेस कंपनीचे एच आर हेड योगेश ठाकूर जबाबदार असल्याचे कामगारांनी सांगितले.

द्रोणागिरी नोड मध्ये 32 सी. एफ.एस (गोदामे) आहेत. ओल्ड मर्स्क कंपनी पागोटे व न्यू मर्क्स नवघर या दोन्ही कंपनीचे योगेश ठाकूर हे एच आर हेड आहेत. दोन्ही कंपनीचे एकच एच आर हेड हे योगेश ठाकूर आहेत.उरण तालुक्यातील न्यू मर्क्स नवघर येथे बदली कामगार घेतले जाते मात्र या कंपनी जवळच असलेल्या ओल्ड मर्क्स कंपनी पागोटे या कंपनीत बदली कामगार घेतले जात नाहीत. योगेश ठाकूर एका कंपनीत बदली कामगार घेतात तर दुसऱ्या कंपनीत बदली कामगार घेत नाहीत हा कुठला न्याय आहे असा सवाल कामगांराना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भार्गव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,रायगड जिल्हा उपाध्यक्ष अडव्होकेट भार्गव पाटील यांनी कामगांरावर अन्याय करणाऱ्या कंपनी प्रशासनाचा जाहिर निषेध केला.दोन दिवसात एक मिटिंग आहे. या मिटिंग मध्ये तोडगा नाही निघाला तर हे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.जर कामगारांना न्याय मिळाला नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भार्गव पाटील यांनी कंपनी प्रशासनाला दिला.ओल्ड मर्क्स कंपनी प्रशासन कामगारांवर जाणून बुजून अन्याय करत असल्याने कामगार संतापले आहेत. बदली कामगार कामावर घेणे, मृत व्यक्तींच्या वारसाना नोकरीत सामावून घ्यावे या दोन मागण्या बाबत कामगारांना न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा कामगारांची आहे.येत्या दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी ओल्ड मर्क्स कपंनी प्रशासनाला दिला आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सदस्य, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.