प्रतिभावान तरुणांनो ‘यंग इंडिया के बोल’ वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हा
प्रदेश प्रवक्ता कोंकण प्रभारी प्रभात झा, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे, उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
उरण (विठ्ठल ममताबादे ): सध्या देशातील तरुणाई समोर बेरोजगारी,महागाई, ह्या समस्यांचे प्रचंड मोठी संकटे उभी आहेत. देशाचे संविधान कुठे तरी धोक्यात येताना दिसते आहे. आणी ह्याच समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व देशातील लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय युवक कॅांग्रेस ने आयोजीत केलेल्या “यंग इंडीया के बोल” ह्या वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील प्रतिभावान तरुणांनी सहभागी व्हा असे आवाहन रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे व उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत ह्यांनी केले.रायगड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उलवे येथील काँग्रेस कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची निवड करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतला आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरूजी व युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी.व्ही यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रजी घरत यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ह्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते प्रभात झा यांची प्रमुख उपस्थीती होती त्यांनी माहिती देताना सांगितले.की
हि वक्तृत्व स्पर्धा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संपन्न होईल. ह्या स्पर्धेसाठी युवक ने एक गुगल फॅांर्म जारी केलेला आहे. सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व स्पर्धकांनी
http://ycea.in/youngindia/index.html
ह्या लिंकवर फॅांर्म भरुन आपली नांव नोंदणी दि. १५ जुन पर्यंत करावयाची आहे.
नोंदणी फी १०० रुपये ठेवण्यात आली आहे ती फॅार्म भरतांना ॲानलाईन पद्धतीने भरावयाची आहे.( प्रदेश भरणार आहे )
नोंदणी केलेल्या स्पर्धकाला स्पर्धेचे ठिकाण व वेळ १८ जुन रोजी कळविण्यात येईल.
स्पर्धेचे विषय हे वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, धार्मिक उन्माद, लोकशाही वाचवणे ह्या संबंधाने असतील.
जिल्हा स्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम बक्षीस ५ हजार ) द्वितीय बक्षीस ३ हजार,3 तृतीय बक्षीस २ हजार ठेवण्यात आली आहेत.जिल्हास्तरावरील विजेत्या स्पर्धकांना पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग देण्यात येईल. स्पर्धेमधे जिल्हा, प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना त्या त्या स्तरावर युवक कॅांग्रेसचा प्रवक्ता म्हणुन काम करण्याची संधी देण्यात येईल.
ह्या वक्तृत्व स्पर्धेत वरील लिंक वर ॲानलाईन फॅार्म भरुन १५ जुन पुर्वी आपली नांव नोंदणी करावी व स्पर्धेत जास्तित जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष निखिल डवळे यांनी केले. नोंदणी करत असतांना काही अडचणी आल्यास रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीला संपर्क साधावा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.सदर पत्रकार परिषदेत प्रदेश प्रवक्ता कोंकण प्रभारी प्रभात झा व रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे व उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत, जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदारे , NSUI उरण तालुका अध्यक्ष आदित्य घरत, मयुरेश घरत ,अश्विन नाईक , बाळू कोळी उपस्थित होते.