भारत-बांगला देश दरम्यानची रेल्वे सेवा सेवा पुन्हा सुरु
मैत्री, बंधन या दोन्ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर
नवी दिल्ली : भारत- बांगला देशादरम्यान बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे.
दोन्ही देशादरम्याच्या नागरिकांचे दळणवळण सुकर व्हावे, यासाठी बंद असलेली मैत्री एक्स्प्रेस तसेच बंधन एक्स्प्रेस या ट्रेन सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
या सेवेमुळे दोन्ही देशातील संबंध अजून दृढ होतील, असा विश्वास उभय देशाना वाटत आहे.