Ultimate magazine theme for WordPress.

भिंगार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनसेचे दीपक पाटील

0 23

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष दीपक नारायण पाटील यांची पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भिंगार (भेरले भिंगार,भिंगारवाडी, शेडुंग या तीन गावांमधून) उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे दीपक पाटील हे महाराष्ट्र सैनिक म्हणून पनवेल तालुक्यामध्ये खूप नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. गाव पातळीवर,खेड्यांमध्ये दीपक पाटील यांच्या कामाची खूप ठळक पद्धतीने छाप आहे.पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीने दिपक पाटील यांचे कार्य सुरु असून दिपक पाटील यांची ग्रामस्थांनी व इतर सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध निवड केली आहे. तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेत दीपक पाटील यांचे अभिनंदन व सत्कार केले.

या प्रसंगी रायगड जिल्हा रस्ते आस्थापना संघटक संजय तन्ना,विजय ठाकूर शाखाध्यक्ष भातान व अन्य सहकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, संदेश ठाकुर यांनी देखील फोन करून दीपक पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.गावकऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्या ताबडतोब सोडवण्याकरता पूर्णपणे सहकार्य असेल असा शब्द रामदास पाटील मनसे तालुका अध्यक्ष पनवेल यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.