उरण (विठ्ठल ममताबादे ): कोणत्याही खेळात, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तम शरीराची, निरोगी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी, खेळासाठी आपले शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. शरीर तंदुरुस्त नसेल तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत, खेळामध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी शारीरिक व मानसिक रित्या तंदुरुस्त राहा आणि खेळात प्राविण्य मिळवा असे प्रतिपादन फिटनेस ट्रेनर युवराज साळवी यांनी केले.
भेंडखळ क्रिकेट अकॅडमी तर्फे फिजिकल फिटनेस बाबत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पुंडलिक रामा पाटील हायस्कुल(इंग्रजी माध्यम )पाणदिवे उरण येथे फिटनेस मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी युवराज साळवी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.आपल्या जीवनात कसे वागावे. आपले शरीर कसे तंदुरुस्त ठेवावे. खेळात प्राविण्या मिळविण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे. या कौशल्याचा स्पर्धेत विजयी होण्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा. शरीराचा एखादा अवयव दुखत असेल तर कोणते व्यायाम केला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन फिटनेस ट्रेनर युवराज साळवी यांनी उपस्थित खेळाडू व खेळाडूच्या पालकांना केल
फिटनेस बाबत विविध प्रात्यक्षिके, व्यायाम प्रकार फिटनेस ट्रेनर युवराज साळवी, अभिषेक तिवारी यांनी करून दाखविले. व विद्यार्थ्यांनाही करायला सांगितले. विद्यार्थ्यांनीही यावेळी विविध प्रात्यक्षिके, व्यायाम केला.सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्हा मॅनेजिंग कमिटी मेंबर पंकज पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर, अस्थीरोग तज्ञ डॉ भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील, भेंडखळ क्रिकेट अकॅडेमीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, हेड कोच नयन कट्टा, स्पोर्ट कोच – शरद म्हात्रे, विशाल ठाकूर, असिस्टंट कोच – दर्शन ठाकूर, संदीप ठाकूर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेंडखळ क्रिकेट अकॅडमीला भेंडखळ ग्रामपंचायतचे सहकार्य नेहमीच लाभत असते. त्यामुळे भेंडखळ ग्रामपंचायत, पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल व फिटनेस ट्रेनर युवराज साळवी, अभिषेक तिवारी यांचे भेंडखळ क्रिकेट अकॅडेमी तर्फे आभार मानण्यात आले. व कार्यक्रमाचा समारोप झाला.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |