https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उरण दौऱ्यामुळे उरणमध्ये नवचैतन्य

0 70

उरण दि ११(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांचे दिनांक ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान कोकणातील महासंपर्क दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान युवा नेते अमित ठाकरे मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच त्या त्या भागातील नागरी समस्या जाणून घेतल्या . मनसे पक्षाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने व पक्ष तळागाळात पोहोचविण्याच्या दृष्टीने सदर दौऱ्याचे आयोजन केले होते.

या  दौऱ्याचा एक भाग म्हणून उत्तर रायगड मधील सोमवार दिनांक ११ जुलै २०२२ रोजी युवा नेते अमित ठाकरे  उरण मध्ये आले.तेंव्हा मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत केले.

कर्जत दौरा संपल्यावर अमित ठाकरे उरणला आले. मनसे उरण कार्यालयास त्यांनी भेट दिली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.मनसेच्या नूतन कार्यालयाचे उरणचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. मनसेच्या नवीन कार्यालयाचे फीत कापून अमित ठाकरे यांनी उदघाटन केले. यावेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीरपणे पक्ष प्रवेश केला. महिला भगिनींनी सुद्धा यावेळी पक्ष प्रवेश केला.पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे करळ येथील हॉटेल पिंच ऑफ पाईस येथे रवाना झाले. मनसेचे प्रदेश चिटणीस अल्पेश कडू यांच्या करळ येथील हॉटेल पिंच ऑफ पाईस या हॉटेल मध्ये अमित ठाकरे यांनी जेवण केले. त्यानंतर पनवेल तालुक्यातील पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.

यावेळी मनसेचे  प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव,रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर,उपजिल्हा संघटक रितेश पाटील,तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, प्रदेश चिटणीस अल्पेश कडू,तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर ,तालुका संघटक वाहतूक सेना कुणाल भगत, उरण तालुका संघटक सतीश पाटील, विधानसभा सचिव विजय तांडेल,शहराध्यक्ष धनंजय भोरे, तालुका अध्यक्ष मनविसे गणेश तांडेल ,शेवा शाखाध्यक्ष दिपक सुतार, जसखार शाखाध्यक्ष निशांत ठाकूर, महिला शहराध्यक्ष सुप्रिया राजेश सरफरे, रिक्षा युनियन अध्यक्ष दिनेश हळदणकर, महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकंदरीत अमित ठाकरे यांचे उरण मध्ये जंगी स्वागत झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.