उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) : शनिवार दि.६ ऑगस्ट २०२२ रोजी उरण तालुक्यात खोपटा येथील ओस्ट्रो हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.रायगड जिल्ह्यात मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी संदेशभाई ठाकूर यांची राज ठाकरे यांनी नियुक्ती केल्यानंतरची ही पहिली बैठक आणि उरण तालुक्यात मनसेची गेल्या ८ ते ९ वर्षानंतरची ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या बैठकीस उपस्थित होते.
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती,पनवेल महानगरपालिका, तसेच उरण नगरपालिकेच्या निवडणुका ,येणाऱ्या प्रकल्पात स्थानिकांचा समावेश, खोपटा, दिघोडा ,तसेच उरण शहरात होणारी वाहतूक कोंडी समस्या,पनवेल उरण मधील खराब झालेलं रोड ह्या व इतर अनेक विषयावर चर्चा झाली. जे एन पी ए च्या जे एम बक्सि व बी एम सी टी ह्या कंपनी मध्ये होणाऱ्या भरती बाबत चर्चा तसेच ज्या ठिकाणी आंदोलने करायला लागतील तीथे मोठ्या आंदोलनाची तयारी या विषयावर चर्चा झाली.सदर बैठक मनसे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर,जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी,प्रवीण दळवी,महिला जिल्हाध्यक्षा आदीतीताई सोनार,पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिमेश ओझे, अक्षय सुतार इतर मान्यवरांच्या व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केले. ही बैठक संपन्न होण्यासाठी उरण तालुक्याचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.