मी आजही शिवसेनेसोबतच, खा. राऊतांच्या टीकेला उत्तर देणार नाही : आ. उदय सामंत
वयाने मोठ्या व्यक्तीवर टीका करण्याचे आपल्यावर संस्कार नाहीत
रत्नागिरी : शिवसेनेला घटक पक्षांपासून वाचवण्यासाठी शिंदेसाहेबांनी केलेल्या उठावात आपण सामील झालो याचा राग खासदार विनायक राऊत यांना आला असावा म्हणून संगमेश्वर रत्नागिरी मतदारसंघाचा शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी आपणावर टीका केली त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली असली तरी आपण त्याना व या मेळाव्यात ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना कोणतेही उत्तर देणार नाही असे प्रतिपादन रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी व्हिडीओद्वारे केले आहे.
आ. सामंत यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना सांगायचंय की मी आजही शिवसेनेत आहे कोण गैरसमज पसरवत असतील तर त्याला बळी पडू नये असेही सांमत यांनी सांगितले याबाबत उदय सामंत काय म्हणाले.