रत्नागिरीत रंगला बीच कुस्ती स्पर्धेचा थरार !!
समुद्रकिनार्यावर कुस्ती स्पर्धेचा राज्यातील पहिलाच उपक्रम
50 मुलांसह 18 मुलींचा देखील सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरी कुस्ती असोसिएशनकडून रविवारी जिल्हास्तरीय बीच कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धा आणि त्यातही ती बीचवर… हा थरार अनुभवताना अनेकांना पुरेपूर लुटला. मुलींची सर्वसाधारणपणे कुस्ती म्हटले की कोल्हापूर, सातारा आणि हरियाणाचे नाव समोर येते. मात्र, रत्नागिरीत मांडवी समुद्र किनारी राज्यातील पहिल्याच बीच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 50 मुले तर 18 मुलींनी सहभाग नोंदवला होता.
या 18 मुलींमध्ये कुमार गटात नेहा दुधाने खेड विजयी, सलोनी ठसाळे चिपळूण उपविजयी तर वरिष्ठ गटात मोनिका घाग चिपळूण विजयी तर कमल नितोरे उपविजयी यांना सन्मानित करण्यात आले. कुस्ती स्पर्धेतील मुलांचा निकाल पुढील प्रमाणे, 30 किलोपर्यंत वजन गटात विजयी: पार्थ नागवेकर रत्नागिरी, उपविजयी: आदित्य पवार रत्नागिरी, 30 किलो पूर्ण गट : विजयी पार्थ माटे चिपळूण, उपविजयी यश जावळे, चिपळूण. 60 किलोपर्यंत गटात विजयी किरण घाग चिपळूण, भावेश सावंत रत्नागिरी. 70 किलो गट : विजयी महंमद शेख चिपळूण, उपविजयी केतन शिर्के रत्नागिरी. 80 किलो गट: विजयी साहिल खटकुट रत्नागिरी, संदीप गुरव रत्नागिरी. खुला गट: विजयी मारुती बिर्जे रत्नागिरी, सयोग कासार रत्नागिरी. सर्व विजेत्या व उपविजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात
आले.