राजापूरमधील रिफायनरी प्रकल्पाला चालना देणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली पेट्रोलियम मंत्र्यांची भेट
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिले आश्वासन
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी सोमवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान राजापूर रिफायनरी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून येत्या कॅबिनेट मध्ये रियफायनरी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले.
भविष्यात मोठा रोजगार कोकणात निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात लवकर करावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.
माजी खासदार तथा भाजपा खासदार निलेश राणे ट्विटरवर लिहितात…
आज दिल्लीत पेट्रोलियम मंत्री स. पुरी जी यांच्या दालनात राजापूर रिफायनरी संदर्भात मीटिंग झाली. केंद्र सरकार रिफायनरी राजापूर बारसू येथे आण्यासाठी सकारात्मक आहे आणि योग्य ती पावलं उचलत आहे.