रायगडच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे ) : 13 ते 14 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या बंगलोर येथे 34 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये रायगडच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात कुमिते व काता प्रकारात पदके पटकावली.त्यामध्ये अमिता घरत दोन गोल्ड मेडल, अमिषा घरत एक सिल्वर व गोल्ड मेडल, कार्तिकी पाटील एक गोल्ड व एक ब्रांझ मेडल, ऋतुजा ठाकूर एक सिल्वर व ब्रॉझ मेडल, आर्वी केदारी एक गोल्ड एक सिल्वर मेडल, विनया पाटील दोन गोल्ड मेडल, नेत्रा गावंड एक गोल्ड मेडल व एक ब्रांझ मेडल, मानसी ठाकूर एक सिल्वर मेडल व एक ब्राँझ मेडल, वैदही घरत एक सिल्वर व एक ब्राँझ मेडल, समीक्षा पाटील गोल्ड व एक सिल्वर मेडल, रोहित घरत एक गोल्ड मेडल, शुभम ठाकूर दोन गोल्ड मेडल, शुभम म्हात्रे दोन गोल्ड मेडल, आकाश भिडे एक गोड व सिल्वर मेडल, ऋग्वेद जेधे एक गोल्ड एक सिल्वर मेडल, श्रेय मोकल दोन गोल्ड मेडल, श्रेयस वटाणे दोन गोल्ड मेडल, हर्षा ठाकूर एक गोल्ड मेडल, हंसिका मोकल एक गोल्ड मेडल व एक ब्राॅझ मेडल, मनस्वी पवार एक सिल्वर मेडल व एक ब्रांझ मेडल यांनी यश संपादन केले. ही स्पर्धा बेंगलोर गोंडू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेकरिता प्रमुख मार्गदर्शन शिहान वसंतन मलेशिया कोच यांनी केले.तसेच ही स्पर्धा शिहान गणेश कर्नाटका प्रेसिडेंट यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत बंगलोर, कर्नाटका, मँगलोर, चेन्नई,महाराष्ट्र 17 राज्यांची 350 मुले सहभागी झाली होती.या विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन शिहान राजू कोळी इंडिया प्रेसिडेंट गोशिन रियु, सेन्सई गोपाळ म्हात्रे रायगड प्रेसिडेंट, संतोष मोकल डेप्युटी रायगड प्रेसिडेंट, शंपाई राकेश म्हात्रे, सुलभा कोळी, अपर्णा मोकल,विघ्नेश कोळी, निकीता कोळी यांनी केले. तसेच अमिता, अमिषा, कार्तिकी, आर्वी, समिक्षा, नेत्रा, हर्षा, हंसिका, रोहित, शुभम ठाकूर, रूग्वेद, श्रेय, श्रेयस यांची नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.रायगड जिल्ह्यातील या सर्व विजेते स्पर्धाकांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.