Ultimate magazine theme for WordPress.

रायगड एक्सप्रेस स्व. सुधीर तांडेल यांना मारणोत्तर जीवन गौरव

0 45

रायगड प्रीमियर लीगतर्फे जासखारच्या सुपुत्राला सन्मान

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील ज्या लेजन्ड खेळाडूने संपूर्ण भारतासहित भारताबाहेर जाऊनदेखील आपल्या अचूक टप्याच्या एक्सप्रेस गोलंदाजीची अक्षरशः हुकमावत गाजवली असें विक्रमवीर लेजन्ड रायगड एक्सप्रेस म्हणून संपूर्ण राज्यात ज्यांची ओळख आहे, असे उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र स्वर्गीय सुधीर तांडेल यांना रायगड प्रीमियर लीग तर्फे मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

ज्या महान लेजन्ड गोलंदाजामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यासहित जसखार गावाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात एक वेगळीचं ओळख मिळाली असे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचे लाडके लेजन्ड क्रिकेटपट्टू स्वर्गीय सुधीर तांडेल यांच्या जाण्याने सर्व क्रिकेट प्रेमीवर दुःखाचे डोंगर कोसळले होते.त्यांची आठवण आजहि अनेक क्रिकेट रसिक प्रेषकांना येत आहे. सुधीर तांडेल यांचे नाव काढताच सर्वजण भावुक होतात. सुधीर तांडेल यांच्या मृत्यूचे दुःख आजही प्रत्येकाच्या मनात असले तरी अशा या क्रिकेट खेळातील नामवंत, प्रसिद्ध खेळाडूला मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याने सुधीर तांडेल यांचे समर्थक, मित्र परिवार, नातेवाईक व जसखार गावासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

सुधीर तांडेल यांनी राहुल 11,मॅचलेस,डिंगडॉग,अमृत 11,बंड्या बॉईज यांसारख्या विक्रमवीर संघांविरुद्धही आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या-भल्या फलंदाजांना अक्षरशः भुरळ पाडली आहे.सुधीर तांडेल म्हणजे एक्सप्रेस गोलंदाज विशेष म्हणजे खोलवर पद्धतीची गोलंदाजी हे त्यांच्या गोलंदाजीचे ठळक वैशिष्ट्य.रायगड टेनिस क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजांना सर्वात जास्त त्रिफळाचीत स्वरूपात बाद करण्याचा विक्रम ज्या महान गोलंदाजाच्या नावे राहिला असें एक हुकमी गोलंदाज फलंदाजांचा कर्दनकाळ रायगड एक्सप्रेस लेजन्ड सुधीर तांडेल. तसेच रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात यष्टीरक्षकांना अतिशय अवघड जाणारा गोलंदाज म्हणजेच रायगड एक्सप्रेस लेजन्ड सुधीर तांडेल.अशी सुधीर तांडेल यांची ओळख होती.

Leave A Reply

Your email address will not be published.