Ultimate magazine theme for WordPress.

रायगड जिल्हास्तरीय फुटबॉल व वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

0 31

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनकडून आयोजन

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे ) : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित रायगड जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण खोपोली, पनवेल आणि उरण मधून एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता आणि यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश मिडीयम हायस्कूल तर मुळेखंड उरण येथील कोळी किंग हा संघ उप विजेता ठरला.

तसेच राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुंबई, मुंब्रा, खोपोली, पनवेल आणि उरण येथील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या रोमहर्षक सामन्याच्या परवणीचा उरण वासियांनी चांगलाच आनंद घेतला. जवळजळ दिड हजार फुटबॉलच्या रसिक प्रेक्षकांनी अंतिम सामन्याचा थरार वीर सावरकर मैदानावर अनुभवला. या रोमहर्षक सामन्या मध्ये विरेश्वर खोपोली संघाने KFA खोपोली संघाला 1 विरुद्ध शुन्य गोलने पराभूत करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.विरेश्र्वर खोपोली संघाने राज्यस्तरीय फुटबॉल प्रथम क्रमांक पटकविला.

जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत 6000 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.21 किलोमीटर पुरुष ओपन गटात राज सरोदे प्रथम क्रमांक, द्वितीय स्वराज पाटील, तृतीय राजेश तांबोळी, उत्तेजनार्थ – प्रशांत घरत, सचिन कामत. तर 10 किलोमीटर स्त्री ओपन गटात प्रथम – ऋतुजा सिकवण, द्वितीय -सुजाता माने, तृतीय मयुरी चव्हाण, उत्तेजनार्थ -साक्षी पाटील, ईश्वरी चिर्लेकर तसेच विशेष विद्यार्थीसाठी आयोजित 200 मीटर स्पर्धेत प्रथम सिद्धांत पाटील, द्वितीय दुर्वेश धोत्रे,तृतीय निशांत कोळी, उत्तेजनार्थ -यश रुपनर यांनी बाजी मारली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे,किरण घरत, जयेश पाटील, सचिन पाटील, मुकेश घरत,प्रवीण घरत, प्रकाश भोईर, विजय पाटील, सुनीत घरत, दिवेश घरत,रविंद्र पाटील,आकाश पाटील,ऍड मच्छिन्द्र घरत, द्रोणागिरी स्पोर्टसचे क्रिडा प्रशिक्षक प्रविण तोगरे, राम चव्हाण, संजीव पाटील यांनी हातभार लावला.

पुरस्कार वितरण माजी आमदार मनोहरशेठ भोईर,जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील,दिनेश पाटील, रवीशेठ पाटील,द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत,महिला विभाग प्रमुख वैशाली घरत,सचिव दिलीप तांडेल, रायगड भूषण एल. बी. पाटील , रायगड भूषण स.ही. पाटील , रायगड भूषण यशवंत ठाकूर , संजीव पाटील , कामगार नेते महेंद्र सावंत,सल्लागार मणिराम पाटील,डोंगरी गावचे माजी सरपंच अनंत भगत,कबड्डी कोच आत्माराम घरत, अंबादेवी डोंगरी संघाचे कर्णधार मंगेश घरत,शिवसेना द्रोणागिरी शाखा शहर प्रमुख जगजीवन भोईर,राजश्री भोईर,आकाश पाटील , सचिन पाटील, मुकेश घरत, मिथुन म्हात्रे आणि ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.