Ultimate magazine theme for WordPress.

रोहा-चिपळूण गणपती स्पेशल मेमू ट्रेन बारा डब्यांची धावणार

0 36

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा ते चिपळूण दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या मेमो स्पेशल ट्रेनला चार अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ही ट्रेन पूर्वीच्या 8 ऐवजी बारा डब्यांची धावणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. दि 19 आॅगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमुच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. या आधी काही वषार्पूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपर्यंत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे.

या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01157 / 01158 ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी दि.19 आॅगस्ट 2022 ते 21 आॅगस्ट 2022, 27 आॅगस्ट ते 5 सप्टेंबर 2022, 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत ही मेमु स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.
कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमु स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. चिपळूणपर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची धावणार आहे.

पूवी ही गाडी आठ डब्यांची जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत येणाºया कोकणवासीयांच्या सोयीसाठी ही गाडी १२ डब्यांची चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.