रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण दरम्यान सुरु करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेर्या दि. 6 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईला परतणार्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी गणेशोत्सवासाठी प्रथमच दिवा – रोहा – चिपळूण (01157/01158) अशी मेमू ट्रेन सुरु करण्यात आली आहे. दीड दिवसांचा गणेशोत्सवा आटोपून चाकरमान्यांची परतीची लगबग सुरु झाल्याने होत असलेली गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने मेमू ट्रेनच्या फेर्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
