सांगली जिल्ह्यातील १०० काँग्रेस कार्यकर्तेही भाजपामध्ये
मुंबई, २३ जुलै : नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ.विक्रांत मोरे, नगरसेविका शोभाताई मोरे, नगरसेवक अर्जुन मराठे, नगरसेवक मिलिंद बाफना यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याच वेळी पलूस (जि. सांगली ) येथील उद्योजक आणि सुमारे १०० काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रभारी खा.सी.टी.रवी, प्रदेश सरचिटणीस आ.श्रीकांत भारतीय, केंद्रीय प्रवक्त्या खा.डॉ.हीना गावित, माजी मंत्री आ.विजयकुमार गावित, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.