पाच वर्षांपूर्वी पक्षातून केली होती हकालपट्टी
राजापूर : राज्य स्तरावर शिवसेने अंतर्गत झालेल्या बलाढ्य बंडाळीचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असतानाच पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे प्रयत्न सेना पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. सन २०१७ सालच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना एका पत्रान्वये दिले आहेत.
या पदाधिकाऱ्यांत पाचलमधील अप्पा साळवी, संदीप बारसकर, प्रसाद पाथरे, सुरेश ऐनरकर, श्रीमती शशिताई देवरूखकर व श्रीमती पूर्वा पाथरे आदींचा समावेश आहे.