Ultimate magazine theme for WordPress.

संगमेश्वर पंचायत समितीची आरक्षण सोडत 28 जुलैला

0 44

देवरुख : संगमेश्वर पंचायत समिती आरक्षण सोडत दि. 28 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. हि सोडत पंचायत समितीत होणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा व पंचायत समित्या अधिनियम 1961मधील कलम 13 उप कलम(1) कलम 58(1)(अ) प्रमाणे पंचायत समिती क्षेत्रात अनुसूचित जाती/जमाती व स्त्रियांच्या आरक्षणासह राखून ठेवायच्या जागा व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे. तसेच आरक्षण प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करणेसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगमेश्वर पंचायत समितीचा आरक्षण कार्यक्रम जूलै 28 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह. पंचायत समिती संगमेश्वर-देवरूख येथे सकाळी 11 वाजता होणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत या कार्यक्रमाच्या निरिक्षक अधिकारी म्हणून काम पहाणार आह
या आरक्षण सोडतीला राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.