Ultimate magazine theme for WordPress.

संघटनेच्या यशाचे श्रेय हे एकते मध्ये आहे : कामगार नेते सुधीर घरत

0 53

उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) : संघटनेच्या यशाचे श्रेय हे एकतेमध्ये आहे याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे महाभारताचे युद्ध आहे. कौरव सेनेमध्ये एकापेक्षा एक असे शुरवीर महायोध्दे होते.परंतु प्रत्येका मध्ये मी पणा होता त्यामुळे ते कधीच एक संघ झाले नाहित. लढले नाहित. परंतू पांडव संख्येने कमी असून सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली एकविचाराने लढले म्हणून त्यांचा विजय झाला. स्वतः साक्षात भगवान श्री कृष्णांनी रथाचे सारथ केले. कमीपणा मानला नाही.कारण त्यांना सत्याचा, धर्माचा विजय घडवून आणायचा होता.भारतीय मजदूर संघाच्या यशाचे श्रेय हे एकते मध्ये आहे. इथे सर्वांच्या विचारांचा आदर केला जातो. व मी पणाला अजिबात थारा नाही, असे कामगार नेते सुधीर घरत यांनी भारतीय मजदूर संघाच्या 68 व्या वर्धापन दिनी कामगार मेळाव्यात आपल्या भाषणात सांगितले

भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने भारतीय मजदूर संघाचा 68 वा वर्धापन दिन जेएनपीटी टाउनशीप येथे संपन्न झाला. या निमित्ताने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर घरत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पुढे सुधीर घरत म्हणाले की जेएनपीटीचे अधिकारी स्वतःचे वयक्तिक इगो सांभाळण्याकरिता कामगारांच्या हिताशी खेळत आहेत. त्यांचे न्याय हक्क डावलत आहेत. म्हणून येत्या 29 जुलैला बंदचे हत्यार आपल्याला उपसावे लागत आहे.एक दिवसीय बंद ने प्रशासनाचे डोळे उघडणार नसतील तर बेमुदत बंदची हाक दयावी लागेल असा इशारा सुधीर घरत यांनी दिला आहे.

यावेळी मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.या कामगार मेळाव्यात भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, माजी कामगार विश्वस्त रवींद्र पाटील, जनार्दन बंडा यांची देखील भाषणे झाली.यावेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे जिल्हा संघटन मंत्री रंजन कुमार, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, लंकेश म्हात्रे,धर्माजी पाटील, प्रमोद पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.