चिपळूणसह संगमेश्वर तालुक्यातील 28 बैल जोड्या सहभागी
उद्या मुंबई -गोवा महामार्गालगत कोंडमळा येथे भातलावणी स्पर्धा
रत्नागिरी : चिपळूण तालुक्याती भोम येथे नुकत्याच पार पडलेल्या सामूहिक भात लावणी स्पर्धेत मालघर येथील स्वस्तिक पवार यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेतीकडे युवा वर्गाचा कल वाढावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकणात सामूहिक भात लावणी नांगरणी स्पर्धांचे आयोजन केले जाते याचाच एक भाग म्हणून चिपळूण तालुक्यातील भोम येथे सामूहिक भात नांगरणी लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भोम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी तेथील संभाजी शिर्के तसेच मिलिंद शिर्के यांनी पुढाकार घेतला होता. तसेच संगमेश्वर तालुक्यातील युवा शेतकऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण 28 बैल जोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. चिपळूण संगमेश्वर मधील अनेकजण भात लावण्याची ही थरारक स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते.
या स्पर्धेत चिपळूण सह संगमेश्वर देवरुख येथील घाटी 14 तर गावठी 14 अशा 28 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील मालघरे येथील स्वस्तिक मुरलीधर पवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. यासाठी स्वस्तिक पवार यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक 7000 तृतीय क्रमांकास 5000 तर चौथ्या क्रमांकास तीन हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत दुसरा क्रमांक संगमेश्वर तालुक्यातल कोसुंब येथील समीर बने, तिसरा क्रमांक चिपळूणमधील शिरवलीतील राजेश सावर्डेकर तर चौथ क्रमांक कै. अनंत जाधव यांच्या बैलजोडीने पटकावला.
मालघर येथील या स्पर्धेपाठोपाठ चिपळूण तालुक्यातच कोण मळा येथे दिनांक 20 जुलै रोजी अशीच सामूहिक भात लावणी नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.