साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई, दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे वास्तव्य राहिलेल्या घाटकोपर येथील निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीदेखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
या प्रसंगी खासदार राहुल शेवाळे यांचेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.