नेत्रावतीसह मंगला एक्सप्रेसला इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवला
पुढील महिन्यापासून अंमलबजावणी होणार
दोन्ही गाड्या कोकण रेल्वेमार्गे धावणा-या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती तसेच मंगला एक्सप्रेसला इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढविण्यात आला आहे हा बदल नेत्रावती एक्सप्रेसला दि. ११ सप्टेंबर तर मंगला एक्स्प्रेसला १२ सप्टेंबर २०२२पासून लागू होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी (16345 /16346 ) नेत्रावती एक्सप्रेस 22 एलएचबी डब्यांसह धावते. गाडीचा स्लीपर ’चा एक डबा कमी करून त्या ठिकाणी इकॉनॉमि थ्री टायर श्रेणीचा एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इकॉनोमी थ्री टायर श्रेणीचा डबा वाढवण्यात आलेली दुसरी गाडी मंगला एक्सप्रेस (12 617 12 618 ) आहे. या गाडीला आधी एकोनोमी ती टायर श्रेणीचा एक डबा होता त्या ठिकाणी आता या श्रेणीचे दोन डबे या गाडीला जोडले जाणार आहेत. मंगला एकस्पेस एर्नाकुलम ते दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकादरम्यान सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावते.