हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसला उद्यापासून अतिरिक्त कोच
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणार्या हापा -मडगाव एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या बाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हापा – मडगाव (22908/22907) या साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीला स्लीपर श्रेणीचा एक डबा हापा -मडगाव फेरीसाठी दि. 10 ऑगस्टपासून तर मडगाव ते हापा फेरीसाठी दि. 12 ऑगस्ट 2022 पासून वाढण्यात येणार आहे. यामुळे गणेशोेत्सवात मोठ्या संख्येने कोकणात येणार्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.