लोवले येथे भात पीक उत्पादनांचे निरीक्षण कार्यक्रम संपन्न
- शेतकऱ्यांना बक्षिसांचे वितरण
- किसान क्राफ्ट फाउंडेशनचा उपक्रम
संगमेश्वर दि. ५ : श्री स्वामी समर्थ मठ लोवले ता. संगमेश्वर येथे भात पिक उत्पादनाचे निरीक्षण करण्यात आले. त्याआधी किसान क्राफ्ट कंपनी बंगलोरचे बियाणे नमून्या करता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते. आशिष भिडे यांनी लावलेल्या SDSR1007 ही भात पीक जात १२५ ते १३० दिवसात कापण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसोबत घेण्यात आले.या कार्यक्रमाला कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी बांधव, अभय शेट्ये, किसान क्राफ्टचे स्मित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकरी बांधवांना किसनक्राफ्ट फाउंडेशन मार्फत उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले. प्रथम बक्षीस – आशिष भिडे (माभळे)
दृतिया बक्षीस – अनंत पाध्ये (गोळवली)
तृतीय बक्षीस – शांताराम जाधव (शिवणे) यावेळी प्रगतशील शेतकरी आशिष भिडे यांनी किसान क्राफ्ट तर्फे देण्यात आलेले भात बियाणे उत्पादनास उत्तम असल्याचे नमूद केले. बियाणे प्राप्त झाल्यानंतर किसान क्राफ्ट तर्फे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल भिडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.