https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून विरारमध्ये ४७ वे मरणोत्तर देहदान

0 85

वसई दि. ३१:- तालुक्यातील आगाशी चाळफेठ येथील मंजुळा अरुण वर्तक, वय ६७ यांचे आज निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ४७ वे देहदान आहे.

मंजुळा वर्तक


श्रीमती वर्तक यांचा मुलगा श्री. राजेश अरुण वर्तक व जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे पदाधिकारी यांनी पार्थिव नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केले. तेथील आरोग्यशास्त्राच्या डॉक्टरनी तो स्वीकारला. कॉलेजने तसे प्रमाणपत्र वर्तक कुटुंबियांना दिले आहे.

नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजकडे मंजुळा वर्तक यांचा देह सोपवताना वर्तक परिवार व संप्रदायाचे पदाधिकारी.


या निर्णयाबद्दल श्री. राजेश वर्तक आणि परिवाराचे जगद्गुरुश्री यांच्या स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी वर्तक परिवारातील त्यांचे पती श्री अरुण वर्तक, मुलगा – राजेश वर्तक, भाऊ – विशाल वर्तक उपस्थित होते.


संप्रदायाचे वसई जिल्हा अध्यक्ष सर्वश्री महेश हातगे, व्यवस्थापक शिवाजी करकरे,
सेवाकेंद्र अध्यक्ष – रमेश देवरुखकर, सेवाकेंद्र पदाधिकारी – स्वप्निल पाटील, सतीश पाटील, महेश नाईक उपस्थित होते.
जगद्गुरुश्री यांनी संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातून ५६५३७ अर्ज भरून दिले होते. ते त्या त्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. आत्तापर्यंत त्यातील ४७ जनांचे मरणोत्तर देहदान त्यांच्या नातेवाईकांनी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.