रत्नागिरी : अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला असून 7 फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.
अभ्युदय मित्र मंडळाचं गणेशोत्सवाचं हे 21 वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव या ठिकाणी होत असतो.
अभ्युदय नगर नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृह इथे श्रींची ही मनमोहक मूर्ती विराजमान झाली असून सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध रंगी कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
3 फेब्रुवारी रोजी संजय बुवा मेस्त्री यांचे भजन, 4 फेब्रुवारी रोजी स्नेहदीप कला मंच प्रस्तुत राम विजय परब लिखित नाटक चौकटीतलं राज्य, 5 फेब्रुवारी रोजी जादूचे प्रयोग आणि संकेता सावंत यांची तायक्वांदो प्रात्यक्षिके तर सहा फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान सालाबादप्रमाणे 4 फेब्रुवारी रोजी श्री गणेश यागाचं आयोजन करण्यात आलं असून याच दिवशी महिलांसाठी हळदीकुंकू आणि महिलांचं अथर्वशीर्ष पठण होणार आहे.
दि. 1 फेब्रुवारी रोजी लहान मुलांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने या उत्सवाचा प्रारंभ झाला असून उत्सव संपेपर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी आवर्जून आनंद घ्यावा आणि श्रींच दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी रोजी श्रींच्या सवाद्य विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होईल.