नांदगाव येथे कृषिदूतांकडून अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणचे कृषीरत्न संघाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत वेगवेगळी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जात आहे त्यामध्ये नांदगाव ब्राम्हणवाडी येथील श्री. गोपाळ जयंत जोशी यांच्या निवासस्थानी अळंबी उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वीपणे घेण्यात आला. यावेळी गावातील काही शेतकरीही उपस्थित होते.
हे प्रात्यक्षिक गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
कमी जागेत व सेंद्रिय प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल तसेच गावातील शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून सुद्धा हा पर्याय होईल हा या प्रात्यक्षिक घेण्यामागचा उद्दिष्ट होता.
हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी कृषिरत्नचे विद्यार्थी कु.ऋषिकेश पवार, कु. रुपेश भगत, कु.योगीराज कुंभार, कु. प्रतीक माळी, कु. केदार पाटील, कु. प्रथमेश मगदूम, कु .प्रथमेश शिखरे, कु. अनिकेत पाटील, कु. साहिल पैंगनकर, कु.आशिष श्री कुमार, कु.आकाश नायर, कु.नागेश रक्ते, कु. संकेत खरात यांचा सहभाग होता.