महसूल पंधरवडा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता
रत्नागिरी, दि. ४ : महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसिलदार कार्यालय आदी परिसराची आज महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसिलदार राजाराम म्हात्रे, तहसिलदार तेजस्वीनी पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.