आरटीओ कार्यालयाचे लिपिक
मंगेश नाईकना पर्यावरण भूषण पुरस्कार
रत्नागिरी : बिया गोळा करून त्यापासून रोपे बनवून ती मोफत वाटण्याच्या उपक्रमाबद्दल मंगेश नाईक यांना ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत विकास परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे हा पुरस्कार जाहीर झाला होता.
त्यांच्या पर्यावरण विषयक श्री. नाईक रत्नागिरी येथील आर.टी.ओ. कार्यालयात मुख्य लिपिक आहेत. ते परिसरातून भारतीय प्रजातीच्या बिया गोळा करतात. त्यापासून रोपे तयार करून विविध संस्था, व्यक्तींना मोफत देतात. कार्याची दखल घेऊन ३० जानेवारीला हा पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत अंबरकर होते.
या सोहळ्यात श्री वसंत इंगळे यांना अभिनय भूषण, श्री.अभय वर्तक यांना समाज भूषण, श्री.धनंजय उपासनी यांना दिव्यांग क्रीडा भूषण,
पुण्याच्या सौ. अपूर्वा दामले याना कर्तृत्व भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
श्री मंगेश नाईक गेल्या दोन वर्षापासून रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मुख्य लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांना
समाजकार्याची आवड आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाची स्वच्छता केली. वृक्ष लागवड करून ते त्यांची जोपासना करतात. कार्यालयात येणाऱ्या लोकांची सुसंवाद साधतात. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर नाईक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.