रत्नागिरी येथे ९ डिसेंबर रोजी विभागीय डाक अदालत
५ डिसेंबरपर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन
रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे दुपारी 3 वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे.
इच्छुकांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे 05 डिसेंबर 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.
पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.