रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव, तसेच तृतीय वर्षाचे सत्र ५ मधील विद्यार्थ्यांचे ‘ॲक्वाकल्चर इंजीनीरिंग’ च्या सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव कालावधीमध्ये शोभिवंत मासे विक्री केंद्र, ‘ॲक्वा व्हिला शॉप ‘, आणि ‘ॲक्वा लाइफ अॅक्वेरियम ‘, कोल्हापूर येथे भेट दिली.
या भेटीदरम्यान श्री. जावेद म्हेतर व श्री. फारूक म्हेतर यांच्या मालकीच्या ‘ॲक्वा व्हिला’ शोभिवंत मासे विक्री केंद्र तेथील श्री. फारूक म्हेतर यांचे चिरंजीव श्री. सैफअली म्हेतर यांनी विद्यार्थ्यांना शोभिवंत मासे विक्री केंद्रा विषयी माहिती करून दिली. श्री. जावेद म्हेतर व फारूक म्हेतर यांच्या अभ्यासु व्यक्तिमत्व व शोभिवंत मशांची आवड यातून निर्माण झालेले हे विक्री केंद्र असंख्य शोभिवंत माश्यांचे दालन आहे.
तसेच विद्यार्थ्यांना श्री. नरेंद्र कुलकर्णी यांच्या मालकीच्या ‘ॲक्वा लाइफ अॅक्वेरियम’ (नेचर अॅक्वेरियम गॅलरी) शोभिवंत मासे केंद्र, कोल्हापूर येथे ही भेट दिली. या बाबत श्री. कुलकर्णी यांनी विद्यार्थीना या बाबत माहिती दिली. श्री. कुलकर्णी हे त्यांच्या पर्यावरण शास्त्रातील सखोल तज्ञ व नैसर्गिक घटक यांच्या संयुक्तिक प्रतिकृति अॅक्वेरियम मध्ये उतरवतात. या दोन्ही अॅक्वेरियमच्या वैशिष्ठपुर्ण मांडणीचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतली.
या भेटीमध्ये कु. कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णुकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी दोन्ही शोभिवंत मासे विक्री केंद्रांचे मालक यांनी प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांना मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि कार्यानुभव अभ्यासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या शोभिवंत मासे विक्री केंद्र भेटीचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.