उरण येथे १ डिसेंबरला आरोग्य व रक्तदान शिबिर
- न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेतर्फे १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन, उरण येथे पनवेल हॉस्पिटल (पनवेल) यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर, आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर तेरणा ब्लड सेंटर तेरणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई यांच्या सहकार्याने भव्य दिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात विविध समस्या भेडसावत असल्यामुळे कमीत कमी वेळेत चांगले सुविधा देऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्याचा दृष्टिकोनातून व आरोग्य विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने या भव्य दिव्य अशा आरोग्य शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा तसेच इच्छुक रक्त दात्यांनी मोठया प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश भगत यांनी जनतेला केले आहे.
नागरिकांनी येताना आपले सर्व जुने रिपोर्ट तसेच आधार कार्ड, पिवळे /केसरी रेशन कार्ड सोबत आणावे, असेही आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा –
रुपेश भगत फोन नंबर – 9619395292,
हनुमान म्हात्रे – 9867886480
श्याम गावंड – 9664034347
सुरेंद्र म्हात्रे – 8879610105,
किरण म्हात्रे – 9930313554,
दिपक गावंड – 7738779889,
संपेश पाटील – 7738099061,
दिनेश पाटील – 7718049775