रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर भागात माघी गणेशोत्सवानिमित्त या वर्षापासून प्रथमच सुरू झालेल्या महागणपतीचे विसर्जन वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
यावेळी आरोग्य मंदिरा येथे माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दिनांक १ फेब्रुवारीपासून हा गणेशोत्सव उत्साहात सुरू होता. यानिमित्त शाळकरी मुलांचे अथर्वशीर्ष पठण, गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप, भजनआदी कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
महागणपतीसह शहरातील इतर माघी गणेशोत्सवामधील गणेश मूर्तींचे देखील विसर्जन करण्यात आले.