https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

भारतीय ‘संस्कृती’ची इटलीत छाप!

0 206

उरणची सुकन्या संस्कृती भोईर बनली इटलीतील युनिव्हर्सिटी आ‌ॅफ बोलोग्ना येथील स्टुडन्ट अ‌ॅम्बेसिडर!

उरण दि. २० (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नवघर गावाच्या कै. हिरूबाई धनाजी भोईर यांची नात व धनश्री हरेश्वर भोईर यांची सुकन्या संस्कृती भोईर हिने आपले आणि उरण तालुक्यासह नवघर गावचे नाव सातासमुद्रापार झळकवले आहे. आपल्या कौशल्य बुद्धीच्या जोरावर आपला ठसा उमटविण्याच्या जिद्दीने एक-एक पाऊल पुढे टाकत आज पुढील शिक्षण परदेशी घेण्याचे स्वप्न साकार केले आहे.

संस्कृती भोईर

प्राथमिक शिक्षण नवी मुंबई येथील जे.एन.पी.टी विद्यालय येथे घेऊन १२ वी पर्यंतचे शिक्षण यु.ई.एस उरण येथे घेऊन पुढील पदवी शिक्षण ए.आय.के.टी.सी युनिवर्सिटी आ‌ॅफ मुंबई येथे पुर्ण करून पुढील शिक्षण घेण्याची जिद्दीने आता ती मास्टर आ‌ॅफ फार्मास्युटिकल बायोटेक्नोलॉजी या उच्च शिक्षणासाठी इटली येथील प्रथम क्रमांकावर असणा-या युनिवर्सिटी आ‌ॅफ बोलोग्ना येथे शिक्षण घेत आहे.

आज कुमारी संस्कृती हरेश्वर भोईर हिने आपल्या देशासह रायगड जिल्हासह उरण तालुक्यातील नवघर गावचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. आज इटली येथील कु.संस्कृती हरेश्वर भोईर ही क्यू. एस. वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग नुसार जगभरातील १३३ क्रमांकावरील युनिवर्सिटी ऑफ़ बोलोग्ना (University of Bologna, Italy) ची स्टुडन्ट अम्बेसिडर (Student ambassador) झाली आहे. युनिवर्सिटी आ‌ॅफ बोलोग्ना या तीच्या युनिवर्सिटीमध्ये झालेल्या स्टुडन्ट अ‌ॅम्बेसिडर निवडणुकीत संस्कृती भोईर हिची प्रथमच भारतीय अ‌ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून भुतपुर्व स्टुडन्ट अम्बेसिडर तसेच या युनिवर्सिटीतील अनेक देशातून आलेल्या विद्यार्थीवर्गासह शिक्षकांनी कु.संस्कृतीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कु. संस्कृतीने पदभार स्विकारला असून भारत देशाची या सुपुत्रीने रायगड जिल्हासह उरण तालुक्यातील नवघर गावाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे संस्कृती हरेश्वर भोईर हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.