https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मध्य रेल्वेवर सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचे आज उद्घाटन ; १ जानेवारीपासून नियमित धावणार!

0 173

मुंबई : पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दि. ३०.१२.२०२३ रोजी मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नियमित सेवेची सुरुवात ०१/०१/२०२४ पासुन होईल. मध्य रेल्वेचे मार्गावरील ही सहावी वंदे भरत असेल.

२०७०६ मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०१.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल-

स्थानके- आगमन/निर्गमन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई —/१३.१० वाजता
दादर – १३.१७ वाजता / १३.१९ वाजता
ठाणे – १३.४० वाजता/१३.४२ वाजता
कल्याण जंक्शन – १४.०४ वाजता / 1४.०६ वाजता
नाशिक रोड – १६.२८ वाजता/१६.३० वाजता
मनमाड जंक्शन – १७.३० वाजता / १७.३२ वाजता
औरंगाबाद – १९.०८ वाजता / १९.१० वाजता
जालना – —/२०.३० वाजता

२०७०५ जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस-
दि. ०२.०१.२०२४ पासून दररोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार त्याच दिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
स्थानके – आगमन/निर्गमन
जालना —/०५.०५ वाजता
औरंगाबाद – ०५.४८ वाजता/०५.५० वाजता
मनमाड जंक्शन – ०७.४० वाजता/०७.४२ तास
नाशिक रोड – ०८.३८ वाजता/०८.४० वाजता
कल्याण जंक्शन – १०.५५ वाजता/१०.५७ वाजता
ठाणे – ११.१० वाजता/११.१२ वाजता
दादर – ११.३२ वाजता / ११.३४ वाजता
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – ११.५५ वाजता/–
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद


संरचना: एकुण ८ डबे
१ वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह क्लास आणि ७ वातानुकूलित चेअर कार

Leave A Reply

Your email address will not be published.