परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सोलर सिस्टीमचे उद्घाटन
चिपळूणल : अपारंपरिक व नूतनीक्षम आणि पर्यावरण स्नेही ऊर्जेचा वापर ही काळाची गरज ओळखून परशुराम एज्युकेशन सोसायटी संकुलात 32.16 के डब्लु फोटोहोल्टीक्स सोलर सिस्टम, द सेंटर फॉर एन्वाॅरमेंटल रिसर्च अँड एजुकेशन मुंबई व एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून बसविण्यात आली.या सोलर सिस्टमचा उद्घाटन सोहळा दि.22/02/2024 रोजी संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याकरिता सी. इ. आर. इ. संस्थेच्या शबनम सिकंदर मॅडम, श्रीमती दिपाली मॅडम, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीचे श्री सुभ्रतो रॉय व श्रीमती तेजस्विनी हुलसुरकर मॅडम, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल श्री हेमंतजी भागवत, उपाध्यक्ष श्री सुधीर तलाठी, कार्याध्यक्ष श्री मकरंद जोशी, उपकार्याध्यक्ष श्री राजीव कानडे, कार्यवाह श्री संजय मोने, उपकार्यवाह श्री विजय चक्रदेव त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी श्री पराग भावे, श्री अभय चितळे, श्री साईनाथ कपडेकर, श्री तुषार गोखले, श्री विवेक संसारे तसेच शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात परशुराम पूजनाने झाली. श्री सुब्रतो रॉय सर व कार्यवाह डॉ. संजय मोने यांच्या हस्ते परशुरामाचे पूजन करून प्रकल्पाचे उद्घाटन श्री सुब्रतो रॉय यांनी केले. त्यानंतर सोलर सिस्टिमची पाहणी पाहुण्यांच्या समवेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली, संस्था सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंतजी भागवत यांचे हस्ते परशुराम प्रतिमा, श्रीफळ व पुष्प देऊन सुब्रतो रॉय यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती तेजस्विनी हुलसुरकर यांचा सत्कार डॉ. संजय मोने यांनी तर शबनम सिकंदर मॅडम यांचा सत्कार श्री मकरंद जोशी तसेच श्रीमती दिपाली मॅडम यांचा सत्कार श्री विजय चक्रदेव यांनी केला. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊ काटदरे यांचा सत्कार उपाध्यक्ष श्री सुधीर तलाठी यांनी केला, त्याचप्रमाणे श्री उदयजी पंडित यांचा सत्कार श्री राजीव कानडे यांनी केला.
पर्यावरण संरक्षणव संवर्धन संदर्भात काम करणारी सी. इ. आर. इ. या संस्थेविषयी माहिती देणारी ध्वनिफीत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पदाधिकारी यांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंतजी भागवत यांनी केले, सौर ऊर्जा प्रकल्पाचे विद्यार्थ्यांच्या, संस्थेच्या दृष्टीने पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले. सौर ऊर्जा व पर्यावरण संवर्धन संदर्भात शाळेतील विद्यार्थिनी कुमारी स्वरा विखारे हिने सौर ऊर्जेचा शाळेसाठी उपयोग तसेच कुमारी आर्या केळकर हिने कासव संवर्धनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुब्रतो रॉय यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेच्या, संस्थेच्या विकासासाठी शाळेतील, संस्थेतील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असते, तसेच संस्थेच्या उत्कर्षासाठी संघटन महत्त्वाचे असते ते संघटन कौशल्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येते.असे म्हणून त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे श्री भाऊ काटदरे यांनी संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कशी करते याबाबत माहिती सांगितली. पर्यावरण संरक्षण व संवर्धन कामात सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे असे त्यांनी सुचित केले. प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यांनी तयार केलेल्या वस्तू दाखविल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.संजय मोने यांनी केले तसेच सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ लोवलेकर यांनी केले.
हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
Konkan Railway | आंगणेवाडी यात्रेसाठी १ मार्चपासून विशेष गाड्या