शेतकरी कामगार पक्षामध्ये इन्कमिंग सुरू
महेश बालदी यांचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकापमध्ये
उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील. रायगडमधील उरण विधानसभा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी होणारी लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे, असे बोलले जाते. आपला असलेला गड राखण्याच आवाहन भाजप समर्थक आमदार महेश बालदी यांच्यासमोर राहणार आहे. तर आपण गेल्या पंधरा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या सामाजिक,अध्यात्मिक,शैक्षणिक,रोजगार निर्माण अशा अनेक कार्याच्या जोरावर पुन्हा विधानसभा खेचून आणण्यासाठी शेकाप चे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे संपूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण उरण विधानसभा पिंजून काढत आहेत.
उरण विधानसभा क्षेत्रात नेहमीच तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज धुतुम येथील महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे अध्यक्ष रोशन ठाकूर यांनी त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आणि मित्र-परिवारा सोबत माजी आमदार बाळाराम पाटील आणि शे.का.प. नेते पनवेलचे मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
उरण विधानसभेमध्ये यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लाल बावटा फडकवण्यासाठी माझ्यासोबत शेकाप कार्यकर्ता संपूर्ण ताकतीने काम करत आहे. मी आजपर्यंत विविध क्षेत्रात पक्षाच्या आणि माझ्या वैयक्तिक जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी काम केली आहे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यासाठी आम्ही केलेली काम आहेत ती लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहचवत आहेत. उरण आणि खालापूर परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे यावर काम करणे गरजेचे आहे. विकासाच्या दृष्टीने आमच्या आमच्यावर विश्वास ठेवून आज अनेक श्री.रोशन ठाकूर यांच्यासारखे तरुण शेकापक्षामध्ये येत आहेत यामुळे आमची ताकद भविष्यात नक्कीच वाढेल.
– श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे.
खजिनदार, शेतकरी कामगार पक्ष,रायगड.
यावेळी बोलताना शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की प्रत्येक वेळी पक्ष प्रवेश करताना सगळेजण स्वतःसाठी काही मागणी ठेवतात आणि प्रवेश करतात यावेळी सुद्धा ठाकूर कुटुंबीयांनी महेश बालदी यांना आमदार या पदावरून पायउतार करण्याची मोठी मागणी केली आहे त्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि भरघोस मतांनी प्रितमदादा म्हात्रे यांना निवडून आणू ही मागणी त्यांनी केली याचा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो.
यावेळी पं.स. मा.सभापती काशिनाथ पाटील कृ.उ.बा.स. सभापती नारायणशेठ घरत, उरण विधानसभा चिटणीस जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, विभागीय चिटणीस विलास फडके, चिटणीस राजेश केणी, उपस्थित होते.